Duration 2:57

Sondai Fort Trek | Matheran one tree point

300 watched
0
45
Published 21 Jun 2020

कर्जतच्या आसपास कोथळीगड, भिवगड, सोनगिरी, इरशाळगड, राजमाची, ढाक इ. अनेक परिचित आणि अपरिचित किल्ले आहेत. ह्या किल्ल्यांच्या मांदियाळीत एक छोटा आणि आटोपशीर असलेला सोंडाई किल्ला लपून बसला आहे. किल्ल्यावर टाक्यांशिवाय इतर कोणतेही अवशेष नसल्यामुळे किल्ला बघायला जास्त वेळ लागत नाही. तटबंदी, प्रवेशद्वार आणि इतर वास्तूंचा अभाव, किल्ल्याचा मागे असलेला उंच डोंगर ह्यांच्यावरून सोंडाई किल्ल्याचा मुख्य उपयोग टेहळणीसाठी आणि आजुबाजुच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा. टेहळणीचे ठिकाण असलेला सोंडाई किल्ला एका दिवसाचा ट्रेक करण्यासाठी चांगला पर्याय आहे. सूचना: सुरक्षित भटकंती करा. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नका. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरात सांगून ठेवा. वाट माहिती नसल्यास गांवातून वाटाड्या बरोबर घ्या. मळलेल्या वाटेवरूनच जा, अनोळखी वाटेने जाण्याचे धाडस करु नये.

Category

Show more

Comments - 2